मुंबई : जर कोणत्याही पतीला त्याच्या लग्नाच्या पहल्या रात्री माहित पडलं की त्याची पत्नी ही स्त्री नाही तर...? अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे रायबरेलीमध्ये. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला माहित पडलं की आपली पत्नी ही तृतीयपंथी आहे आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीवीगंजमधील महेशपूर येथून ही घटना समोर आली आहे. पतीने याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीची याबाबतची कोणतीही माहिती मुलाला देण्यात आली नव्हती. २८ एप्रिलला या दोघांचा विवाह झाला होता. पण विवाहाच्या पहिल्याच रात्री ही गोष्ट समोर आली आणि पतीला मोठा धक्का बसला.


पोलीस याबाबतचा पुढचा तपास करत आहेत. सध्या मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी आहे. पण या घटनेनंतर या मुलाच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे.