स्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला.
कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं तिच म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा संदिलीदेखील आपल्या चुलत भावासोबत लग्नासाठी चालली होती. अपघातात ते दोघे देखील जखमी झाले होते.
स्मृती इराणी यांनी अपघात झाल्यानंतर जखमीला मदत केल्याची माहिती ट्विटरवरुन टाकली. मात्र डॉ नागर यांची मुलगी संदिलीने अपघातानंतर स्मृती इराणी मदत न करताच गाडीतून निघून गेल्याचा आरोप केला आहे.