नवी दिल्ली: आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत. आयडीबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप 4 दिवस चालणार आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेनं ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारनं आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा डाव मांडला आहे, त्यामुले आम्ही संपाचं हत्यार उगारलं आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेनं दिली आहे. 


यंदाच्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेमधली हिस्सेदारी 49 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यामुळे खासगी गुंतवणूकदार बँक विकत घेतील आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे. 


आयडीबीआय बँकेचे 32 हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत.