नवी दिल्ली : पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडियामधील रिपोर्टनुसार भारत सरकारने घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता एक नवी रणनीती तयार केली आहे. रिपोर्टनुसार या योजनेंतर्गत पाकिस्तानलगत २९०० किमी लांबीच्या सीमेवरील सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या योजनेला मंजुरी दिलीये. 


या योजनेंतर्गत पाच स्तरीय सुरक्षा समिती नेमण्यात आली होती. यामुळे चोवीस सीमेवर कडेकोट सुरक्षा ठेवता येईल. ज्यामुळे पश्चिम सीमेवरुन दहशतवाद्यांची घुसखोरी रोखता येईल.  


रिपोर्टनुसार, CIBMS म्हणजेच कॉम्प्रिहेंसिव बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीममुळे 24*7*365सीमेवर सुरक्षा तैनात करणे शक्य होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. दरम्यान ही उपाययोजना खर्चिक आहे. मात्र सरकारच्या मते दहशतवाद्यांची घुसखोरी पूर्णपणे रोखण्यासाठी हा उपाय चांगला आहे. या योजनेंतर्गत सीमेच्या दोन्ही दिशांवर नजर ठेवता येणार आहे. यामुळे केवळ दहशतवाद्यांची घुसखोरीच नव्हे तर या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात मदत करणाऱ्यांनाही ताब्यात घेता येईल.