कराची : भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आणि पाकिस्तानच्या 'तेहरिक - ए - इंसाफ'चा अध्यक्ष इमरान खान यानं पुन्हा एकदा भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गरळ ओकलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी मोदींना असं उत्तर देईल जे नवाझ शरीफ देऊ शकत नाहीत' असं इमरान खाननं म्हटलंय. आपल्या रायविंड मार्च दरम्यान आपण भारताला हे उत्तर देऊ, अशी दर्पोक्ती इमरान खाननं दिलीय. संपूर्ण पाकिस्तानातून अनेक लोक या मार्चमध्ये सहभागी होतील. 


याआधी इमराननं नवाझ शरीफ यांना 'नाकाबिल' म्हणत हिणवलं होतं. याबद्दल बोलताना, जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरायला तयार असतो तेव्हा पाक सरकार आम्हाला संभावित दहशतवादी हल्ल्याची चेतावणी देत असतं, असंही त्यानं म्हटलंय.