आयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद
थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.
मात्र अशा प्रकारची नोटीस मिळाल्याचं व्होडाफोनकडून मान्य करण्यात आलं आहे. पण, कंपनीच्या मते, हे प्रकरण मागील वर्षीच निकालात काढण्यात आलं होतं. सध्या आंतरराष्ट्राय पातळीवर हा वाद आहे.
तर दुसरीकडे व्होडाफोन कंपनीचं म्हणणं आहे की, ‘परदेशी गुंतवणूकदारांसाठी करभरण्यासाठी चांगलं वातावरण भारतात असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच सांगितलं होतं. पण केंद्र सरकार आणि आयकर विभाग यांच्यात संवाद कमी आहे असं दिसून येत आहे.’
व्होडाफोनला झालेला भांडवली नफा भारतातल्या मालमत्तेवर झाल्याचा इन्कम टॅक्स खात्याचा युक्तिवाद आहे. व्होडाफोन ग्रुप पीएलसीनं १४ हजार २०० कोटींचा कर थकविला असल्याची नोटीस आयकर विभागानं धाडली आहे. व्होडाफोननं ११०० कोटी डॉलरमध्ये ‘हच’चा व्यवसाय विकत घेतला होता. याच्याशी निगडीत टॅक्सबाबत २०१४ पासून केस सुरु आहे.