छत्तीसगड :  छत्तीसगडमध्ये आयकर विभागाने जनधन योजनेच्या खातेदारांवर लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. राज्यात एकूण १३२५ संशयीत खातेदारांना नोटीसा पाठवून खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशाचा हिशेब मागितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदी लागू केल्यानंतर अशा लोकांच्या खात्यावर अचानक मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली आहे. याची सूचना आयकर खात्याला मिळाली. 


या संदर्भात आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बँकांच्या मॅनेजरला पत्र पाठवून खात्यांचा तपशील मागविला आहे. काळा पैसा पकडला जाण्याच्या भीतीने अनेक बड्या धेंडानी जनधन खात्यात रक्कम जमा केली आह. शून्य बॅलेन्स असलेल्या खात्यात खोट्या पद्धतीने मोठी रक्कम जमा करण्यात आली. बँकेत मोठे व्यापारी, उद्योगपती, ब्युरोक्रॅट आणि राजकारणी बँकेत दिसून आले नाही. त्यामुळे आयकर खात्याचे अधिकारी हैराण आहेत. 


छत्तीसगडमध्ये एकूण १३०० च्या आसपास खाते सापडले, हे सर्व नक्षलवादी भागातील आहेत. या खात्यात जमा झालेल्या रक्कमेचा स्त्रोत जाणून घेण्यात येत आहे. अशा प्रकारे खात्यातील रकमेचा स्त्रोत नाही कळला तर ती जप्त करण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर जनधन खात्यात काळापैसा जमा करणाऱ्यांना जेलमध्ये पाठविण्याची ताकीद दिली होती.