नवी दिल्ली : काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीदरम्यान काळापैसा लपवण्यासाठी कितीही प्रयत्न अनेकांनी केले असतील पण अशा लोकांना आता चांगलाच दणका बसणार आहे. प्रत्येक व्यवहारांवर सरकारची नजर आहे.


नोटबंदीनंतर आयकर विभागाने सर्च ऑपरेशन सुरु केलं. आयकर विभागाची नजर त्या 6 मार्गांवर आहे ज्याद्वारे काळापैसा पांढरा करण्यात आला.


1. KYC खात्यामध्ये ज्यांचे 9 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली गेली त्यांची चौकशी होणार आहे.


2. ज्या खात्यांमध्ये अनेक दिवसांपासून काहीही व्यवहार नाही झाला पण नोटबंदीनंतर अचानक पैसे जमा झाले अशा लोकांची चौकशी होणार आहे.


3. जनधन खात्यात 50 हजारापेक्षा अधिक जुन्या नोटा जमा केले असल्यास त्यांची चौकशी होणार.


4. जुन्या पैशांनी 1 लाखापेक्षा अधिक लोन किंवा ड्राफ्ट दिला असल्यास त्यांनाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.


5. ज्यांनी 30 हजार रुपयांपेक्षा अधिक हाउंसिंग टॅक्स आणि 1 लाखापेक्षा अधिकचं कमर्शियल टॅक्स जुन्या नोटांच्या माध्यमातून जमा केले असतील तर त्यांचीही चौकशी होणार आहे.


6. जुन्या नोटांनी 10 हजारापेक्षा अधिकचं वीज बिल किंवा पाणी बिल भरलं असल्यास अशा लोकांवर आयकर विभागाची नजर असणार आहे.


नोटबंदीनंतर सरकारने 3 ते 4 लाख कोटीचा काळापैसा संपेल अशी शक्यता वर्तवली होती पण असं नाही झालं. 500 आणि 1000 च्या जवळपास 15 लाख कोटी म्हणजेच 97 टक्के रक्कम बँकांमध्ये जमा केली गेली. सरकारला शंका आहे की 5 लाख कोटींचा जुना पैसा लपवला गेला आहे. त्यामुळे कोणी किती पैसा जमा केला आणि व्यवहार केले याच्या मार्फत अशा लोकांचा शोध घेणं सुरु झालं आहे.