आता एटीएममधून काढता येणार २४ हजार रुपये
लवकरच पुन्हा एकदा एटीएममधून २४ हजार रुपये तुम्हाला काढता येणार आहे. सध्या २४ हजार रुपये एका आठवड्याला काढता येत आहेत.
नवी दिल्ली : लवकरच पुन्हा एकदा एटीएममधून २४ हजार रुपये तुम्हाला काढता येणार आहे. सध्या २४ हजार रुपये एका आठवड्याला काढता येत आहेत.
पंतप्रधान मोदी सरकार लवकरच एटीएममधूनही २४ हजार काढता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या एटीएममधून १० हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. कॅश लॉजिस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष रितुराज सिन्हा यांच्या मते नोटबंदीनंतर आता स्थिती सामान्य आहे. एटीएमवर लागणारी गर्दी देखील कमी झाली आहे. मागील ५ दिवसात एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात कॅश टाकली गेली आहे.