नवी दिल्ली : गेल्या 150 वर्षांत पाहायला मिळाला नाही असा क्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला पाहायला मिळाला. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं यूनायटेड किंगडमला मागे टाकलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हा नाटकीय बदल गेल्या 25 वर्षांपासून भारताची जोरात आर्थिक समृद्धी आणि गेल्या 12 महिन्यांपासून पाऊंडची घटत जाणारी किंमत यामुळे शक्य झालाय' असं फोर्ब्स मॅगझीननं म्हटलंय.


इंग्लंडला पछाडत भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात बळकट अर्थव्यवस्था बनलीय. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आता केवळ अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. 


केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी देशाच्या या प्रगतीवर आपला आनंद जाहीर केलाय. 'भारत यूकेहून पुढे निघून गेलाय आणि अमेरिका, चीन, जापान तसंच जर्मनी यांच्यानंतर पाचवा मोठा जीडीपी बनलाय... भारताची लोकसंख्या मोठा आधार असू शकतो परंतु, ही खूप मोठी उडी आहे' असं त्यांनी म्हटलंय.