...तर प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही - राजनाथ सिंह
सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने घुसखोरी मात्र थांबत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने घुसखोरी मात्र थांबत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
तसेच वारंवार दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय. राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेचा आढावा
भारताने कधी कोणावर हल्ला केलेला नाही. तसेच दुसऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा आमचा इरादाही नाही. आमची परंपरा ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आहे. आम्ही गोळीबार सुरु करत नाही. मात्र आमच्यावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही, अशा कडक शब्दांत सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला.