नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय सैनिकाकंडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून मागील ११ दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. ११ दिवसात ५००० मॉर्टार तर ३५००० हून अधिक गोळ्यांचा वापर केला गेला आहे. बीएसएफने पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंगला प्रत्यूत्तर देत 3000 लॉन्ग रेंज मॉर्टार, 2000 शॉर्ट रेंज मॉर्टार सोडले. लॉन्ग रेंज मॉर्टारची रेंज 5 ते 6 किलोमीटर तर शॉर्ट रेंज 900 मीटर पर्यंत असते. याशिवाय बीएसएफने MMG, LMG आणि रायफलचाही उपयोग केला.


क्रॉस-बॉर्डर फायरिंग जम्मूमध्ये अधिक सुरु आहे. पाकिस्तानी सैनिक हे अधिक रात्रीच्या वेळेत फायरिंग करतात. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावा यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. भारताने केलेल्या फायरिंगमध्ये आत्तापर्यंत १५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.


१९ ऑक्टोबरनंतर सुरु झालेल्या पाकिस्तानी फायरिंगमध्ये बीएसएफचे 3 जवान शहीद झाले. पाकिस्तानने ११ दिवसात आंतरराष्ट्रीय सीमेवर ६० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. तर पाकिस्तानला त्याचं चोख प्रत्यूत्तर भारतीय लष्कराकडून दिलं जात आहे.