श्रीनगर : पाकिस्तानजडून सतत गोळीबार सुरु आहे. आज सकाळपासूनच शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात २ भारतीय जवान शहीद झाले आहे. भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सकाळी पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झाला. यामध्ये जवान गुरुसेवक सिंह शहीद झाले. नंतर पुन्हा याच भागात गोळीबार झाला आणि आणखी एक जवान शहीद झाला. दोन वेळा पाकिस्तानातून घुसखोरीचा प्रयत्न केला जो भारतीय लष्कराने हाणून पाडला.


पाकिस्तान सेनेने नागरिकांना आणि जवानांना लक्ष्य केलं. ज्यामध्ये २ नागरीक आणि २ जवान जखमी झाले आहे. पाकिस्तानकडून अजूनही गोळीबार सुरु असल्याचं समजतंय.