नवी दिल्ली : सरकारने सोमवारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांचा कमीत कमी पगार आता १० हजार रुपये असणार आहे. लोकसभेत बोलतांना कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे. 


'सरकार हे कामगारांची स्थिती सुधरावी यासाठी प्रयत्नशील आहे आणि कामगारांचे आधिकार सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने काम करत आहे. १७ एप्रिलला दिल्या गेलेल्या सरकारी आदेशानुसार आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांना कमीतकमी १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.' अशी माहिती बंडारू दत्तात्रेय यांनी दिली आहे.