भारत सरकार करणार मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी
भारत सरकारच्या संरक्षण खरेदी परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होणार आहे. भारत सरकार या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार हत्यारांच्या बाबतीत एक मोठी डील करणार असल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील तणाव वाढल्यानंतर कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास त्याला उत्तर देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी केली जाणार आहेत.
नवी दिल्ली : भारत सरकारच्या संरक्षण खरेदी परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होणार आहे. भारत सरकार या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार हत्यारांच्या बाबतीत एक मोठी डील करणार असल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील तणाव वाढल्यानंतर कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास त्याला उत्तर देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी केली जाणार आहेत.
संरक्षण मंत्र्यांपासून गृहमंत्री, तिनही सेना प्रमुख यांना चोख प्रत्यूत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराचं त्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात येईल. वेळ आल्यास भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.