नवी दिल्ली : पाकिस्तानच्या उत्पन्नापेक्षा इंडियन ऑईल या कंपनीचे उत्पन्न अधिक असल्याचे ग्लोबल जस्टिस नाऊने केलेल्या अभ्यासातून समोर आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५मध्ये इंडियन ऑईलचे वार्षिक महसूल उत्पन्न ५४.७ बिलियन डॉलर इतके होते तर दुसरीकडे पाकिस्तानचे वार्षिक महसूल उत्पन्न ३८.७ बिलियन डॉलर होते. म्हणजेच इंडियन ऑईलचे उत्पन्न पाकिस्तानपेक्षा ४० टक्के अधिक होते.


या अभ्यासानुसार, जगातील १० सर्वात मोठ्या कॉर्पोरेशन कंपन्या काही देशांच्या एकूण महसूल उत्पन्नापेक्षाही अधिक कमाई करतात. वॉलमार्ट, अॅपल, शेलसारख्या कंपन्या रशिया, बेल्जियम, स्वीडन या देशांपेक्षाही अधिक कमावतात. 


तसेच या तीन कंपन्यांचे महसूल उत्पन्न जगातील सर्वात गरीब १८० देशांच्या एकूण महसूल उत्पन्नापेक्षाही अधिक आहे. यात देशांमध्ये आयर्लंड, इंडोनेशिया, इस्रायल, कोलंबिया, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, इराक आणि व्हिएतनाम या देशांचा यात समावेश होतो.