नवी दिल्ली : तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रवास करताना देशातील नागरिकांना भारतीय लिहिणे बंधन कारक असेल शिवाय परदेशी नागरिकांना त्यांचा पासपोर्ट नंबर लिहिणे बंधनकारक असणार आहे. पासपोर्ट शिवाय त्यांना देशाचा कोड नंबरही लिहावा लागेल.


तसेच आपले नागरिकत्व आरक्षण अर्जावरही लिहावे लागणार आहे. त्यामुळे कोण कोणत्या ट्रेनमधून आणि कोणत्या मार्गावर प्रवास करीत आहे, याची माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच कोणत्या देशाचा नागरिक आहे, याचीही माहिती मिळेल. भारतीय रेल्वेने हा नियम तात्काल लागू करणार आहे.


नव्या नियमामुळे कोणत्या मार्गावर किती परदेशी नागरिक प्रवास करीत आहेत. तसेच सुरक्षेबाबत काळजी घेण्यास मदत होईल. तसेच ओळख पटविणेही शक्य होणार आहे. ज्या मार्गावर जास्त प्रमाणात परदेशी नागरिक प्रवास करीत त्यामार्गावर जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करता येतील आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय.