मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारताने एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संशोधकांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून निपटण्यासाठी नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनवता येणार आहे. या तंत्रज्ञानापासून बनणाऱ्या पेट्रोल-डिझेलची क्वालिटी ही अधिक चांगली असणार आहे. हे तंत्रज्ञान सध्या फक्त जर्मनी आणि अमेरिककडे आहे आणि आता भारताकडे देखील.


भारताने जर्मनी आणि अमेरिकेच्या बरोबरीने आस्ट्रेलिया आणि ब्रिटेनला मागे टाकलं आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याला पेट्रोल-डिझेलमध्ये परिवर्तन करण्याच्या या तंत्रज्ञानाला ग्रीन तंत्रज्ञान म्हणतात. हे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा देहरादूनमधील पेट्रोलियम संस्थेच्या संशोधकांनी विकसित केलं आहे.