मुंबई : भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आयकर न भरता तो पैसा वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवल्याची माहिती पुढं येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर शेअर बाजारात कोट्यवधींचे व्यवहार करून इन्कम टॅक्स फाईल न करणा-या व्यक्तींची यादीदेखील आयकर विभागानं तयार केली आहे. कुठलाही शेअर खरेदी करताना किंवा विकताना त्यावर सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स अर्थात एसटीटी भरावा लागतो. याच एसटीटी विभागाकडून आयकर विभागानं सर्व तपशील मागवला असून करबुडवेगिरी करणा-या गुंतवणूकदारांची यादी तयार करण्यात आली आहे.


अशा प्रकारे शेअर बाजारातला काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारकडून पहिल्यांदाच होताना दिसतोय. बघुया, कुठल्या राज्यात किती करबुडवे आहेत.