नवी दिल्ली : देशात सध्या कन्हैया कुमारची चर्चा आहे. त्यावर आता तरुण लेखक चेतन भगतही बोलले आहेत. 'कन्हैया कुमार प्रकरणाने ज्याप्रकारे लोकांचे लक्ष वेधले आहे ते पाहता जे लोक कालपर्यंत मोदींचे कौतुक करत होते तेच आज त्यांच्यावर टीका करत आहेत,' असे चेतन भगत म्हणाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर पोस्ट करताना चेतन भगत म्हणाले की, देशातील तरुणांसोबत पंतप्रधान मोदींची नाळ तुटली आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेत कमी येण्याचे कारण आहे. मोदी आणि त्यांच्या सरकारने तरुणांना काही आश्वासने दिली होती. यातील अनेक आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत. यामुळेच लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे.



पंतप्रधानांचा देशातील तरुणांशी संपर्कच तुटल्याने जेएनयूमधील एका तरुणाच्या भाषणाची चर्चा पंतप्रधानांच्या 'मन की बात' पेक्षा जास्त होत आहे. हार्दिक पटेल असो की कन्हैया कुमार, देशातील तरुणांना त्यांच्याशी बोलणारा नेता हवा आहे, त्यांची मतं ऐकणारा नेता हवा आहे. म्हणूनच देशातील तरुण या व्यक्तींकडे आकर्षित होत आहेत, असेही चेतन भगत म्हणालेत.