नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर जगात अव्वल राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत भारतानं 7.6 टक्क्यांचा विकासदर गाठलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच्या वर्षीतल्या 7.2 टक्क्यांनाही यंदाच्या GDPनं मागे टाकलंय. विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च या तिमाहीत जगभरातल्या अर्थव्यवस्था अस्थीर असताना भारतानं मात्र 7.9 टक्क्यांचा विकासदर कायम राखण्यात यश मिळवलंय. 


या आकडेवारीमुळे पुढल्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झालाय. GDPचे आकडे समाधानकारक असले तरी गुंतवणुकीचा टक्का मात्र घटलाय. गतवर्षीच्या 4.9 टक्क्यांवरून हा आकडा 3.9 टक्क्यांवर खाली आलाय. तसंच उत्पादन वाढही 11.5 टक्क्यांवरून 9.3 टक्क्यांवर आली आहे.