कानपूर : इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातातल्या मृतांची संख्या 121वर जाऊन पोहोचली आहे, तर 200हून अधिक जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील पुखरायन स्टेशनजवळ ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक जनरल, एक सामानाची बोगी, चार एसी बोगी, एस-1 ते एस-4 बोगी असे 14 डबे रुळावरुन घसरले. यामध्ये एस-2 या बोगीचे मोठे नुकसान झालं. या अपघातात जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेल्या ठिकाणचं रेस्क्यू ऑपरेशन लष्कराच्या मदतीनं रात्रीही सुरू राहणार आहे.


रेल्वे रुळ उखडल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.