कानपूर : इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या तब्बल 121वर पोहोचलीये. गेल्या 6 वर्षातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री तीन वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. तब्बल 2000हून अधिक प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करत होते. पाटण्याहून इंदूरसाठी निघालेली या ट्रेनचे 14 डबे कानपूरमधील पुखरायानजीक घसरले. 


या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंतप्रधान तसेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर करण्यात आलीये. याआधी मे 2010मध्ये पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापोर येथे ग्यानेश्वरी एक्सप्रेस घसरुन झालेल्या दुर्घटनेत 148 जणांचा मृत्यू झाला होता.