मुंबई: शीना बोरा मर्डर केसची मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान इंद्राणी आणि पिटर मुखर्जी दोघं एकत्र दिसले. यावेळी इंद्राणीचा चेहरा बघितला तर अनेकांचा ही इंद्राणी आहे यावर विश्वासच बसला नाही. 
आलिशान आयुष्य जगणारी इंद्राणीचे केस पांढरे झाले आहेत, तसंच ती उदास असल्याचंही या फोटोमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


ओमकार नावाच्या एका फोटोग्राफरने हा फोटो काढल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने त्याचा शोध घेतला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे इंद्राणी पोलीस गाडीतून उतरताना त्याने हा फोटो काढला होता. 


इंद्राणी मुखर्जीला १० महिन्यांपूर्वी तिचीच मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. तुरुंगात जाण्याआधी ग्लॅमरस दुनियेत वावरणारी, पार्टीज अटेंड करणाऱ्या इंद्राणीचा हा चेहरा पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.