नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता आणि वेगळ्या विदर्भाचे समर्थक श्रीहरी अणे यांच्यावर येथील एका कार्यक्रमात शाई फेकण्यात आली. पोलिसांनी शाई फेकणाऱ्याला ताब्यात घेतलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील जंतरमंतरवर श्रीहरी अणे आंदोलन करीत होते. त्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. वेगळ्या विदर्भाच्या विरोधात त्यांनी घोषणा देण्यात आल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी, आमच्याच कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याचा दावा केलाय. ते त्यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. 


वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीहरी अणेही तिथे उपस्थित होते. यावळी ते बोलण्यासाठी उभे राहिल्यावर सात ते आठ जणांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली.