रेल्वे स्टेशनवर आता फक्त 5 मिनीटांमध्ये मिळणार पिझ्झा
रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झाली आहे.
मुंबई : रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झाली आहे. आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. याची सुरुवात एटीपी मशीनने म्हणजेच एनी टाईम पिझ्झा देण्याच्या सर्विसने होणार आहे. हा पिझ्झा पाच मिनीटांमध्ये मिळेल असा दावा आयआरसीटीसीनं केला आहे.
आईआरसीटीसीच्या खास मशीनसाठी मुंबईच्या नितेश ठक्कर यांनी मेहनत घेतली आहे. या पिझ्झा मेकींग मशीनची मुळ संकल्पना ही नेदरलेंडची आहे. पिझ्झा सोबतच पुढील काळआत आणखी काही खाद्य पदार्थ तयार करता येतील यासाठीही काम सुरु आहे.
एनी टाईम पिझ्झा मशीनमुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी वेळेत शुद्ध आणि स्वादिष्ट पिझ्झा मिळणार आहे. सुरुवातीला ही मशीन मुंबईच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.