नवी दिल्ली : सध्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. विमान कंपन्यानी त्यांच्यावर प्रवासाची बंदी घातली आहे. मात्र, गायकवाड आडनावामुळे भाजप खासदारांना याचा फटका बसला. त्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडेच तक्रार दाखल केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यामुळे रवींद्र गायकवाड यांची हवाई कोंडी करण्यात आलीय. मात्र रवींद्र गायकवाड प्रकरणाचा त्रास आता दुस-या एका खासदाराला सहन करावा लागतोय. गायकवाड आडनाव आणि खासदार असल्यामुळे विमानतळावर अडवणूक होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी केलाय. 


खासदार आणि आडनाव गायकवाड असल्याचा भाजपचे सुनील गायकवाड यांना मनस्ताप झाला. विमानतळांवर अडवणूक होत असल्याची तक्रार केली. गायकवाड आडनाव असणं गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणी त्यांनी जयंत सिन्हा यांना माहिती दिलीय.