चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे महिन्यात PSLV C34 या प्रक्षेपकाद्वारे कार्टोसॅट २सी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासोबत इतर २१ उपग्रहांचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. यात अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह असणार आहेत.


'मे महिन्यात होणाऱ्या प्रक्षेपणात आम्ही २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याच्या विचारात आहोत. याआधी आम्ही एकाच वेळेस १० उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले आहे. आता आम्ही दुप्पटीपेक्षा जास्तचा विचार करतोय. हे प्रक्षेपण मे महिन्यात होईल अशी आम्हाला आशा आहे,' असं विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे संचालक के सिवन पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.


अमेरिकेच्या 'नासा'ने २०१३ साली २९ उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले होते. हा एक जागतिक विक्रम आहे.