अहमदाबाद : साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. प्रॉपर्टी डिलर असणारा महेश शहा संपत्ती घोषित करून फरार झाला होता. यानंतर एका न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये तो चर्चेसाठी आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून तो गायब होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अघोषित संपत्ती जाहीर करण्याची केंद्र सरकारची योजना असलेल्या आयडीएसच्या माध्यमातून शहानं संपत्ती जाहीर केली होती. ही संपत्ती राजकारणी आणि अधिकाऱ्यांची असल्याचा दावा शहानं केला आहे. याबाबत आपण आणखी खुलासा करणार असल्याचंही तो म्हणाला आहे.