जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका आईनंच आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीची अत्यंत क्रूर रितीनं हत्या केल्याचं उघड झालंय. धक्कादायक म्हणजे, मुलगाच हवा या हव्यासापोटी या मातेनं हे कृत्य केलंय.


१७ वेळा धारदार शस्त्रानं वार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ ऑगस्ट रोजी नेहा गोयल हिनं आपल्या घरी आपली मुलगी गायब झाल्याची आरडाओरड केली. यानंतर कुटुंबियांना ही चिमुरडी एका कपड्यात गुंडाळलेल्या आणि मृत अवस्थेत एसीमध्ये मिळाली. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. धक्कादायक म्हणजे, अवघ्या ४ महिन्याच्या या चिमुरडीच्या शरीरावर १७ वेळा धारदार चाकूनं वार केल्याच्या जखमांच्या खुणा होत्या. 


मुलगा मिळवण्याचा हव्यास...


पोलिसांना सुरुवातीपासूनच चिमुरडीच्या आईवर संशय होता. गुरुवारी पोलिसांनी तिला अटक केली. चौकशीमध्ये नेहानं आपला गुन्हा कबूल केला. नेहाला आठ वर्षांची पहिली मुलगी आहे... दुसऱ्यांदा मुलगा होण्यासाठी तिनं अनेकदा पूजापाठही केले...  परंतु, दुसऱ्यांदाही मुलगीच झाली तेव्हा नेहा खूपच निराश झाली. त्यामुळे तिनं हे कृत्य केल्याचं कबूल केलंय. 


पोलिसांनी केलेल्या फॉरेन्सिक चौकशीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सॅम्पल्स घेतले गेले. मुलीच्या रक्ताचे नमुने नेहाच्या नखांत आढळलेल्या रक्ताशी मॅच झाले. त्यानंतर पोलिसांनी नेहाला अटक केली.