नवी दिल्ली : मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत, तसेच एकुण खात्यांपैकी सुमारे २८ टक्के खाती निष्क्रिय असल्याचंही सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन धन खाते हे केवळ सरकारी अनुदान किंवा लाभ मिळवण्यासाठी आहे, या गैरसमजातून एका व्यक्तीच्या नावाने दोन खाती उघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 


ही बाब मायक्रोसेव्हने १७ राज्यांमधील ४२ जिल्हे आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे, यात समोर आली आहे.


सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 


१) जन धन योजनेअंतर्गत आपण पहिल्यांदा खाते उघडलेले नाही असे 33 टक्के ग्राहकांनी सांगितले 


२) पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतदेखील १४ टक्के ग्राहकांचे हेच मत होते. 


३) नव्या फेरीत अनेक नागरिकांनी दुसऱ्यांदा खाती उघडली आहेत. यापैकी कित्येक खाती वापरात नाहीत.


मायक्रोसेव्हने तिसऱ्यांदा या योजनेची प्रगती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले. जनधन योजनेअंतर्गत डिसेंबर २०१४ मध्ये सर्वात पहिल्या फेरीत अनेक नागरिकांची बँक खाती उघडण्यात आले. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये दुसरी फेरी पार पडली.