नवी दिल्ली : राज्यसभेत विद्यमान सदस्य जावेद अख्तर यांनी मंगळवारी देशातील सध्याच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त करताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेतील भाजप सरकारने आपल्या सदस्यांना आणि मंत्र्यांना सामाजिक वातावरण बिघडविण्यापासून लांब राहण्याचा सल्ला सांगावे, असे आवाहन करत अख्तर यांनी ओवेसींना विरोध करताना तीन वेळा म्हटले, 'भारत माता की जय'.


अख्तर यांनी ओवेसी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. आंध्र प्रदेशातील एक व्यक्ती स्वत:ला राष्ट्रीय नेता समजतोय. त्याची ओळख एका मोहल्ल्याची नाही. तो म्हणत आहे कोणत्याही किमतीत 'भारत माता की जय' म्हणार नाही असे सांगताना म्हणतो की भारतीय राज्यघटनेत लिहिलेले नाही.


शेरवानी आणि टोपी परिधान करणारा हा लोकसभा सदस्य. त्याला प्रश्न आहे की, राज्यघटनेत कुठे लिहिलेय की, शेरवानी आणि टोपी परिधान करण्याचे. हे एवढ्यावर नाही. भारत माता की जय, हे बोलणे हे माझे कर्तव्य आहे. तो बोलण्याचा मला अधिकार आहे, असे अख्तर यांनी चांगलेच खडसावले.


अख्तर यांनी म्हटले, मी बोलणार! 'भारत माता की जय', 'भारत माता की जय' , 'भारत माता की जय'. असे म्हणतात सभागृहात बाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.