जयपूर: भाजप सरकार असलेल्या राजस्थानच्या आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव हटवण्यात आलं आहे. बॅरिस्टर बनल्यानंतर नेहरुंनी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला होता, त्यानंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले, असं याआधीच्या पाठ्यपुस्तकात होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आत्ताच्या सामाजिक विज्ञानच्या पाठ्यपुस्तकामध्ये नेहरुंचा उल्लेखही करण्यात आला नाही. हे पुस्तक बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाही. पण पुस्तक प्रकाशक राजस्थान पाठ्य पुस्तक मंडळाच्या वेबसाईटवर हे पुस्तक अपलोड करण्यात आलं आहे.


या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांची नावं आहेत, पण नेहरुंचं नाव स्वतंत्रता संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत या दोन्ही धड्यांमध्ये नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. राजस्थान सरकार आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.