लुधियाना : जम्मूहून पुण्याकडे निघालेल्या झेलम एक्सप्रेसला मंगळवारी पहाटे येथे अपघात झाला. यात दोन जण जखमी झालेत. लुधियाना जवळच्या फिलौर येथे झेलम एक्सप्रेसचे नऊ डब्बे रुळावरुन घसरले. मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातातील दोघा जखमींना लुधियानाच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडी सतलज ब्रिजच्या दिशेने जात असताना बी ५स एस १, पीसी, एस २, एस ३, एस ४ एस ५, एस ६, एस ७ आणि एस ८ हे डब्बे रुळावरुन घसरले. 


दरम्यान, मदतीसाठी तीन बस घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवित हाणी झालेली नाही.