नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि दक्षिण कोरियातील दिग्गज सॅमसंग कंपनी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ फेब्रुवारीपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात मोबाईल वर्ल्ड काँग्रेसची सुरुवात होतेय. यात नवे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. 


या पत्रकार परिषदेदरम्यान रिलायन्स जिओ आणि सॅमसंग काही मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. यासाठी मीडिया इनव्हिटेशनही पाठवण्यास सुरुवात करण्यात आलीये. 


रिलायन्स जिओ आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातही पाऊल ठेवू शकते. याशिवाय सॅमसंगसोबत काही करारही केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोकल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिओ आपली पकड अधिक मजबूत करु शकेल.