श्रीनगर : अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दोन महाविद्यालयातील जवळपास ३०० मुलींना स्कूटी वाटल्या. स्कीम लॉन्चिंग दरम्यान महबूबा मुफ्ती यांनी स्वत: स्कूटीची सवारीही केली. यावेळी, त्यांचे सुरक्षारक्षक आणि रिपोर्टर्स त्यांच्या मागे धावत होते. 


काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याच्या मृत्यूनंतर हिंसा भडकली होती. त्यानंतर खोऱ्यातील अनेक शाळा - महाविद्यालय अनेक दिवसांपर्यंत बंद होते. अनेक भागांत कर्फ्यु सुरू होता.