`काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान बलात्कार करतात`
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने भारतीय जवानांबाबत धक्कादायक विधान करत नवा वाद निर्माण केलाय. यावेळी त्याच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे जवान आहेत.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने भारतीय जवानांबाबत धक्कादायक विधान करत नवा वाद निर्माण केलाय. यावेळी त्याच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे जवान आहेत.
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये लष्कराचे जवान महिलांवर बलात्कार करतात असं धक्कादायक वक्तव्य त्यानं केलंय. सुरक्षेच्या नावावर जवान महिलांवर बलात्कार करतात असं त्यानं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी बोलताना त्याने हे वक्तव्य केलंय.
गेल्या महिन्यात नऊ तारखेला जेएनयूमध्ये संसद हल्ला प्रकरणातील दोषी अफजल गुरुला फाशी दिल्याच्या विरोधात जेएनयूमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फब्रुवारीला अटक करण्यात आली होती. सध्या दिल्ली हायकोर्टाने त्याला सहा महिन्याच्या जामिनावर सुटका केलीये.