नवी दिल्ली : सत्तेत आल्यापासून भाजपच्या वाचाळवीर नेत्यांची वादग्रस्त विधाने करणे काही थांबलेले नाही. देशभरात जेएनयू वादावरुन गदारोळ सुरु असतानाच राजस्थानातील भाजपच्या आमदाराने धक्कादायक विधान केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ देशविरोधी जागा झाली असून तेथे रात्री आठ वाजल्यानंतर विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली न्यूड डान्स करतात. तसेच तेथे दिवसाला तीन हजार कंडोम्स वापरले जातात असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार ग्यानदेव आहुजा यांनी केलाय. 


येथील लोक देशद्रोही आहेत. संसद हल्ला प्रकरणातील दोषी अफजल गुरुला येथील लोक समर्थन देतात. तसेच दररोज येथे कॅम्पसमध्ये सुमारे तीन हजार बीअऱ कॅन्स आणि बॉटल्स आढळतात. कोण ड्रिंक करत असेल? तुम्हीच ओळखा असं आहुजा म्हणाले. 


तसेच कॅम्पस परिसरात दिवसाला १० हजार सिगारेट आणि चार हजाराहून विड्यांची थोटके सापडतात, असाही आरोप आहुजा यांनी केलाय. आहुजांचे हे विधान एका कॅमेऱ्यात कैद झाले. दरम्यान, त्यांनी हे आरोप केले असले तरी ही माहिती त्यांना कोठून मिळाली याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही.