कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात
जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
नवी दिल्ली: जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
आपण राजकारणात जाणार नाही, असं जामिनावर सुटका झाल्यानंतर कन्हैयानं वारंवार सांगितलं. पण पश्चिम बंगालमध्ये कन्हैया सीपीएमचा स्टार प्रचारक असेल असी घोषणा सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. कन्हैय्याबरोबरचं डाव्या संघटनांचे कार्यकर्ते प्रचारात भाग घेतील असंही येचुरी म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आत्ता सत्तेत असलेली तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांमध्ये सामना रंगणार आहे. त्यातच आता बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपही जोर लावायचा प्रयत्न करत आहे.