जम्मू : काश्मीर खोऱ्यातली स्थिती अद्याप तणावपूर्ण आहे. दररोज दगडफेकीच्या घटना घडत आहेत. आज काश्मीर खोरं बहुतांश शांत असलं तरी कुपवाडा, सोपोर, राफियाबाद इथं हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी PDPचे आमदार मोहम्मद खलिल बंद जखमी झालेत. पुलवामा इथं त्यांच्या वाहनावर काल रात्री उशिरा जमावानं हल्ला चढवला होता. याखेरीज काल दिवसभरात ५ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. 


सलग दहाव्या दिवशी काश्मीर खोऱ्यातली संचारबंदी कायम आहे. तसेच मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रेही खोऱ्यातल्या स्टँडवर पोहोचू शकलेली नाहीत.