हैदराबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी, पक्षाचे आमदार आणि सर्व कार्यकर्ते आज आणि उद्या हमाल म्हणून काम करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षस्थापनेचा वर्धापन दिनाच्या दिवशी येणा-या खर्चाच्या पैशांची उभारणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वजण हमाल म्हणून दोन दिवस काम करणार आहेत. 


मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा कालावधी हमाल दिवस म्हणून जाहीर केला आहे. या काळात टीआरएसच्या सर्व कार्यकर्त्यांनी किमान दोन दिवस हमाल म्हणून काम करुन स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी पैस उभारण्यात मदत करावी असे आवाहनही चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 


येत्या 21 तारखेला हैदराबादजवळ कोंपलीमध्ये स्थापना दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. तर 27 तारखेला वारंगलमध्ये पक्षाची जाहीर सभा होणार आहे. पक्षाने या हमाल दिवसातून 25 कोटी रुपये जमा करण्याचं उदीष्ट ठेवलं आहे.