नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. केजरीवाल यांनी दिल्ली युनिवर्सिटीच्या कुलपतींना पत्र लिहून मोदींच्या बीए डिग्रीची माहिती द्यायला सांगितलं आहे. 


बीए न झालेला माणूस एमए कसा ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी दिल्ली युनिवर्सिटीमध्ये ऍडमिशनच घेतली नाही, त्यामुळे त्यांची कोणतीही मार्कशीट नाही अशी माहिती मला सूत्रांकडून मिळाली असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला आहे. त्यामुळे जर पंतप्रधानांकडे बीएचीच डिग्री नसेल तर ते एमए कसे झाले असा प्रश्नही केजरीवालांनी उपस्थित केला आहे. 


दिल्ली युनिवर्सिटीच्या कागदपत्रांबरोबर छेडछाड ?


केजरीवालांनी एका इंग्रजी पेपरचा दाखला देत दिल्ली युनिवर्सिटीच्या कागदपत्रांबरोबर छेडछाड झाल्याची शंकाही केजरीवालांनी उपस्थित केली आहे. 


गुजरात युनिवर्सिटीनं दिली माहिती


याआधी केजरीवालांनी सीआयसीला लिहिलेल्या पत्रानंतर मोदींनी 1983मध्ये राजनिती विज्ञान या विषयामध्ये एमए केलं आहे, त्यांना 62.37 टक्के मार्क मिळाले होते, असं उत्तर गुजरात युनिवर्सिटीनं दिलं होतं.