नवऱ्याने साडी गिफ्ट केली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले
तु खूप सुंदर आहेसच...मात्र या साडीवर अजून सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तिला साडी गिफ्ट दिली. पत्नीही आपली स्तुती ऐकून खुश झाली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. मंगळवारी सीजीएम कोर्टाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळाले.
खरगोण : तु खूप सुंदर आहेसच...मात्र या साडीवर अजून सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तिला साडी गिफ्ट दिली. पत्नीही आपली स्तुती ऐकून खुश झाली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. मंगळवारी सीजीएम कोर्टाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळाले.
न्यायमूर्ती गंगाचरण दुबे यांनी घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्यांना पुन्हा एकत्र केले. जैतापूर येथे राहणारे संजू यांचा विवाह त्याच शहरातील सानू हिच्याशी झाला होता. सात महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण होऊ लागले. अखेर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याने स्तुती न केल्याने होती नाराज
गेल्या तीन वर्षांपासून या दोघांची केस कोर्टात सुरु आहे. लग्नानंतर पती आपल्याला वेळ देत नाही. तसेच पतीने आपल्या सौंदर्याची स्तुती केली नाही अशी पत्नीची तक्रार होती.
मात्र कोर्टाने दोन्ही बाजूंचे ऐकून घेत त्या दोघांचे समुपदेशन केले. अखेर कोर्टाला त्यांना पुन्हा एकत्र करण्यात यश आले.