सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.
किडनी फेल झाल्याने स्वराज यांना 7 नोव्हेंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होते. 16 नोव्हेंबरला त्यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी स्वराज यांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली होती.