किंगफिशरच्या महिला कर्मचाऱ्यांची पत्राद्वारे माल्यांवर टीका
आंतरराष्ट्रीय महिला दिनी किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीचे अध्यक्ष विजय माल्या यांना खुले पत्र लिहून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनी किंगफिशर एअरलाईन्सच्या माजी महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीचे अध्यक्ष विजय माल्या यांना खुले पत्र लिहून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
माल्या यांनी एअरलाईन्सच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेबाबत सरकार आणि कर्मचारी या दोघांची साफ निराशा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाहीये मात्र त्यानंतरही माल्य शांत का आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.
तुम्ही म्हणता की मी कर्ज थकबाकीदार नाही. मात्र तुम्ही विश्वासाने बैठकीत आम्हाला सांगितले की बँक कर्जाच्या पाच ते दहा टक्क्याहून अधिक रक्कम वसूल करु शकणार नाही. यावरुन तुमच्या विचारांची कीव करावीशी वाटतेस असे महिलांनी पत्रात लिहिले.