नवी दिल्ली : रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एकट्या महिलेला काही कारणास्तव त्या जागेवरून प्रवास करणे असुरक्षित वाटत असल्याने अथवा आसन बदलण्याचे इच्छा झाल्यास त्यासाठी रेल्वे लगेचच सेवा पुरवणार आहे. दक्षिण रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे, याबाबत अनेक महिलांकडून सूचना रेल्वे प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. पुरूष यात्रेकरूंबरोबर प्रवास करताना उपलब्ध आसनावर असुरक्षित वाटत असल्यास त्या जागा बदलाबाबत रेल्वेला विनंती केल्यास तशी सुविधा देण्यात येणार आहे.


सहाय्यक वाणिज्य प्रबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा राबवण्यात येत आहे. यासाठी महिलांना 9003160980 हा क्रमांक देण्यात आलाय. या क्रमांकावर संपर्क साधल्यास ही सुविधा त्यांना मिळणार आहे. याशिवाय महिलांच्या मदतीसाठी 182 हीसुद्धा हेल्पलाईन सध्या कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.


प्रवासादरम्यान नाव आणि मोबाईलनंबर दिल्यानंतर योग्य परिस्थितीची माहिती देण्याची या महिलेने गरजचे आहे. महिलांच्या सुरक्षा आणि सोईसाठी ही सुविधा पुरवण्यात आली आहे, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.