बंगळुरू : कुत्र्याचं पालन पोषण करणे हा एक छंद आणि आवडीचा भाग आहे, यासाठी कितीही पैसे गेले तरी तसाच कुत्रा आपल्या परिवारात आला पाहिजे असं काहींचं स्वप्न असतं. मात्र बंगळुरूच्या सतीष यांनी दाखवून दिलं आहे, शौक बडी चीज है, सतीश यांनी एक-दोन नाही तर एक कोटी रूपयांचा कुत्रा घरी आणला आहे.


कोरियन डोसा मस्टीफ ब्रीडचा कुत्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सतीश एस यांनी सोमवारी कोरियन डोसा मस्टीफ ब्रीडचा कुत्रा आपल्या घरी आणला, त्यासाठी त्यांनी १ कोटी रूपये मोजले.


या ब्रीडचे कुत्रे पहिल्यांदाच भारतात


सतीश यांनी दोन पिलं परदेशातून आणली आहेत, या ब्रीडचे हे कुत्रे पहिल्यांदाच भारतात आले आहेत, सतीश हे इंडियन डॉग ब्रीडर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही दोन पिलं चीनमधून मागवली आहेत.


हुंगण्याची क्षमता फार मोठी


या ब्रीडच्या कुत्र्यांमध्ये हुंगण्याची क्षमता फार मोठी असते, ही कुत्री कोणत्याही वातावरणात रमतात, त्यांचं आयुष्य ७ ते १२ वर्षांचं असतं. ते इमानदार तर असतात, पण शांतही असतात.