नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात आणखी १९ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. राज्यमंत्रींच्या या यादीमध्ये उत्तरप्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल यांचंही नाव आहे. मात्र त्यांच्या आई मुलगी भाजपमध्ये आल्याने खूश दिसत नाही आहे. मुलगी शपथ घेत असतांना त्यांनी टीव्ही बंद केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुप्रिया पटेल अपना दल आणि भाजप युतीच्या तिकीटवर निवडून आल्या आहेत. आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या पक्षाचं भाजपमध्ये विलीन झाला आहे की नाही हे सांगितलं नाही. पण त्यांनी असं म्हटलं की त्या ज्या आज काहीही आहे ते त्यांच्या आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे आहे.


आई कृष्ण पटेल यांनी म्हटलं की, अनुप्रिया पटेल त्याचा पक्ष अपना दलमध्ये नाही आहे. मागच्यावर्षीच त्यांना पक्षातून काढून टाकलं आहे. एका टीव्ही चॅनलला प्रतिक्रिया देत असतांना त्यांनी म्हटलं की, 'जी आईची नाही होऊ शकत ती मोदीची काय होणार'


काय आहे आई-मुलीमधला वाद


ऑक्टोबर २०१५ साली कृष्ण पटेल यांनी अनुप्रिया यांना अपना दल पक्षाच्या महासचिव या पदावरून हटवलं आणि अनुप्रिया यांच्या जागी मोठी मुलगी पल्लवी पटेलला राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं. येथूनच दोघांच्या नात्यामध्ये वाद वाढत गेला. अपना दलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांचा याआधीच निधन झालं आहे.