`बिना हाडाच्या जीभेनं पंतप्रधान मोदी काहीही बडबडतात`
राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीवरून जोरदार हल्ला केलाय.
बिहार : राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीवरून जोरदार हल्ला केलाय.
बिना हाडाच्या जीभेनं पंतप्रधान मोदी काहीही बडबडतात, असं लालूप्रसाद यांनी ट्विटरवर म्हटलंय. नोटाबंदीनंतर या 50 दिवसांत पंतप्रधान मोदींनी काय काय म्हटलंय आणि काय काय नाही म्हटलंय हे त्यांनाही लक्षात नसेल, असंही त्यांनी ट्विट केलंय.
नोटाबंदीनंतर लालूप्रसाद यादव अनेकदा मोदींवर तोंडसुख घेताना दिसत आहेत... तर अनेकदा त्यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी ट्विटरचाही वापर केलाय.
यापूर्वीही त्यांनी, नोटाबंदीला 50 दिवस होत आलेत आणि देशातील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही.... आता पंतप्रधान मोदींनीच सांगावं की त्यांना कुठल्या चौकात शिक्षा दिली जावी, असंही ट्विट केलं होतं. पंतप्रधानांनी 50 दिवसांत देशातील परिस्थिती सुधारली नाही तर जी शिक्षा द्याल तिचा स्वीकार करेल असं म्हटलं होतं.
लालूंच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदी करत पंतप्रधानांनी जनतेचा विश्वासघात केलाय. यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बिघडलीय... याविरुद्ध ते लवकरच एक रॅलीही काढणार आहेत. या रॅलीची घोषणाही ते लवकरच करणार आहेत.