पटना : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देखील याचा चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. लालू यांनी त्यांच्या स्टाईलने होळी न खेळण्याची शपथ घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालू यादव यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना हरवल्यानंतरच होळी साजरा करणार असं म्हटलं आहे. समजावादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या मोठ्या पराभवामुळे लालू यादव यांना धक्का बसला आहे. त्यांचे जावई राहुल यादव यांचा देखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे लालू यादवांनी फक्त कपाळावर टिळक लावून होळी साजरा करणार असल्याचं म्हटलं आहे.


लालू यांची होळी प्रसिद्ध आहे. ते जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री होते तेव्हा होळीमध्ये रंग लावण्याबरोबरच एकमेकांचा कुर्ता देखील फाडायचे. गाण्यांची धूम असायची. लालू यादवांची होळी ही आगळीवेगळी असायची पण आता ते २०१९ पर्यंत होळी खेळणार नाहीत अशी शपथ त्यांनी घेतली आहे.